Tansa Dam Shahapur, Tansa Dam Overflow, Tansa Dam Histroy, Tansa Dam Information, Where is Tansa Dam, Most Famous Dam of Mumbai, Maharashtra.
शहापूर तालुका हा धरणांचा तालुका म्हटले तर वावगे ठरु नये. तानसा, वैतरणा, भातसा ही मोठी धरणे तर खराडा, जांभा डोळखांब ही छोटी धरणे तसेच चोंढा प्रकल्प ही शहापूर तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीची मुंबईची पाण्याची गरज ही तीन मोठी धरणे पूर्ण करीत आहेत. यातील तानसा धरण हे एक शतकापूर्वीचे आहे. हे धरण मुंबईला दररोज सुमारे दोन कोटी गॅलन पाण्याचा पुरवठा करते. मुंबईबरोबरच धरण परिसरातील मोहिली, अघई, वेहडवाल, नेवरा, खलिंग अशा जवळपासच्या गावांनासुद्धा पाणी पुरवले जाते. तानसा जलवाहिन्यांमार्फत पाणी पवई, पोगाव या ठिकाणी पोहचवले जाते आणि तेथून ते मुंबईला जाते. मुंबईच्या उपनगरातील भांडुप येथे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प आहे.
तानसा तलावाच्या बांधकामाचा प्रथम नकाशा मुंबई नगर पालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर मेजर हेक्टर टलो आर. ई. यांनी काढून त्यावर एक अहवाल इ.स.१८७२ मध्ये सादर केला. १० ऑगस्ट १८८३ रोजी थॉमर्स ब्रेनी यांच्या सुचनेनुसार अलिवंट आणि डब्ल्यू. जे. बी. क्लार्क यांनी हे काम हाती घेतले. तत्पूर्वी कॉर्पोरेशनने ठराव मंजूर केला. या संपूर्ण कामासाठी त्यावेळी एक कोटी ५० लक्ष रुपये खर्च आला. ३१ मार्च १८९२ रोजी तलाव खुला करण्यात आला. या कार्यक्रमाला भारताचे व्हॉईसरॉय आणि गर्व्हनर जनरल तसेच नामदार लॉर्ड हॅरिस ( मुंबईचे गव्हर्नर) आणि नामदार मार्किक्स ऑफ लेन्स डाऊन उपस्थित होते. बांध घालण्याचे काम मेसर्स टी. ग्लवर अँड कंपनीने तर नळ घालण्याचे काम मेसर्स बालबेट मिचल आणि कंपनीने केले. त्यावेळी धरणाची उंची ४०५ फूट होती.
१९१२ मध्ये धरणाच्या विस्तार म्हणजेच उंची वाढविण्यात येऊन ती ४९४.५८ फूटावर नेण्यात आली. त्याच वर्षी जोड जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले. १९९५ मध्ये हे काम पूर्ण झाल. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. आर. केंडेल यांच्या कारकिर्दित एस. जे. ट्रिवेसस्मिध जलअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली व आराखड्यानुसार हे काम करण्यात आले. त्यामुळे प्रतिदिन २१ दशलक्ष गॅलन होणारा पाणीपुरवठा ४० दशलक्ष गॅलनपर्यंत वाढला. तलावाचे क्षेत्र ६ चौरस मैलवरून ७ चौरस मैलपर्यंत वाढले आणि धरण क्षमता १८,६०० दशलक्ष गॅलन्सवरुन २९,०४१ दशलक्ष गॅलन्स इतकी वाढली. तानसाजवळील नेवाज गावापासून ते घाटकोपर पर्यंत ५०" व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्यात आली आणि घाटकोपर पासून मुंबई पर्यंत ४८" व्यासाची ओतीव लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली. या कामाचे उद्घाटन लॉर्ड बिलियन यांनी ८/१२/१९९८ रोजी केले. जलवाहिन्या टाकण्याचे काम मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील मेसर्स फर्ग्युसन प्रोप्रायटर्स लि. या कंपनीने केले तर धरणाची उंची वाढविण्याचे काम मेसर्स पालनजी एदूलजी कॉम्सन (मुंबई) यांनी केले.
तानसा धरणाची अंतिम स्वरुपाची कामे १९२१ मध्ये सुरु होऊन १९२६ मध्ये पूर्ण झाली. धरणाची उंची अंतिम पातळीपर्यंत वाढविणे, बहिर्गामी विहीर बांधणे, आटगांव पासून तानसापर्यंत खडीचा पक्का रस्ता, धरणापासून पवईपर्यंत ७२" व्यासाची आणि पवईपासून मुंबईपर्यंत ५७ व्यासाची अशा दोन जलवाहिन्या टाकणे. जलवाहिन्या टाकलेल्या मार्गाच्या बाजूने तानसापासून मुंबईपर्यंत रस्ता तयार करणे (२४ फूट रुंद) अशी कामे हाती घेण्यात आली. सदर काम मुंबई महानगरपालिकेचे जलअभियंता एच. जे. ट्रिवेसस्मिथ यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार व मार्गदर्शनानुसार करण्यात त्यावेळ हुग बायई क्लेशन महानगरपालिकेचे आयुक्त होते. यासाठी ५४० दशलक्ष रुपये खर्च आला. धरणाची उंची वाढविण्याचे काम मेसर्स तेजुकाया and बिल्डिंग कंपनीने केले. जलवाहिनीवरील मार्ग तयार करण्याचे काम मेसर्स दि टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीने आणि वसई खाडीवरील पूल बांधण्याचे काम मेसर्स बेथवाईट अँड कंपनी इंजिनिअर्स लि. यांनी केले.
या सर्व कामामुळे तानसा धरणातून प्रतिदिनी उपलब्ध होणारा पाणीपुरवठा ४० दशलक्ष वरुन ९० दशलक्ष गॅलन्स इतका वाढला आणि धरण क्षमता २९,०४१ दशलक्ष गॅलन्स वरुन ३५,६०० दशलक्ष गॅलन्स इतकी वाढली. अशा रितीने ब्रिटिशांच्या पुढाकाराने ज्याप्रमाणे शहापूर तालुक्यात रेल्वे आली, मुंबई आग्रा हमरस्ता सुरु झाला, त्याप्रमाणे आटगाव जवळ तानसा धरण प्रकल्प आणि त्यानंतर खर्डी (वैतरणा) येथे मोडक सागर वैतरणा धरण प्रकल्प सुरु झाला की ज्यामुळे मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली.