शहापुरातील वाफे येथे असलेले गंगास्थान व गंगास्थान
जवळील त्र्यम्बकेश्वराचे
मंदिर पुरातन मानले जाते. हे स्थान शहापूरच्या पूर्वेस अवघ्या १कि. मी.
अंतरावर आहे. या स्थळास एक पवित्र परंपरा आहे. प्रत्येक जुन्या मंदिरामागे
वा धर्मस्थानामागे एखादी कथा असते. सुमारे ७०० वर्षापूर्वी या ठिकाणी
असलेल्या औदुंबराच्या छायेखाली एक साधुपुरुष ध्यान करत असे. हा साधुपुरुष
दर एकादशी व पौर्णिमेला नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी जात
असे. साधू महाराज र्यंबकेश्वराहून नित्यपुजनासाठी गंगाजल आणत. कालांतराने त्यांना वार्धक्यामुळे शहापूरहून त्र्यंबकेश्वरला जाणे अवघड होवू लागले. नियमात खंड पडत असल्याने व गंगाभेत होत नसल्याने ते व्यथित झाले. त्यांनी औदुंबराच्या व्रुक्षाखाली आराधना सुरु केली. त्यावेळी साक्षात गोदावरीने दृष्टांत देवून भेटीला येते असे सांगितले आणि ज्या औदुंबराच्या व्रुक्षाखाली ते आराधना करत असत, तेथे ती नदी प्रकट झाली,
हि नदी म्हणजे गोदावरी नदी असे मानले जाते. त्यामुळे पुढे हे स्थळ
गंगास्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. प्रकट झालेल्या नदीसाठी कुंड बांधण्यात
आले.
त्र्यंबकेश्वराची गोदावरी गंगारुपाने या ठिकाणी अवतरली म्हणून या ठिकाणी शंकराची प्रतिस्थापना करून त्र्यंबकेश्वराचे मंदिर बांधले. ज्या साधुमहाराजांमुळे गोदावरी नदी येथे प्रकट झाली ते साधुमहाराज औदुंबरवृक्षाखाली समाधिस्थ झाले. सातारा येते वास्तव्यास असलेल्या जोशी आडनावाच्या व्यक्तीस साधू महाराजांनी दृष्टांत दिला. जोशी गंगास्थळी आले, त्यांनी साधूमहाराजांच्या समाधीस्थानाची सेवा सुरु केली, काहीवर्षांनी ते सुद्धा समाधिस्थ
झाले. त्यांची समाधी संतोषीमाता मंदिराजवळ आहे. मराठेशाहीच्या काळात
पुन्हा एकदा गंगास्थान प्रकाशात आले. किल्ले माहुली छत्रपती शिवाजी
महाराजांनी प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा मुक्काम गंगास्थानी होता. किल्ले
माहुली स्वराज्यात दाखल झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ महाराजांनी त्र्यंबकेश्वराजवळ
दुसरे शिवमंदिर उभारले त्याला काशी विश्वेश्वर असे म्हणतात. मुस्लिम
आक्रमणापासून मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून दोन्ही मंदिरांवर कळस बांधलेला
नाही. याजावालाच समर्थ रामदासांनी स्थापन केलेले हनुमान मंदिर आहे. काशी विश्वेश्वरासमोर असलेली दीपमाळ १९४०च्या महापुरात वाहून गेली. त्यामुळे भाविकांनी दुसरी दीपमाळ
उभारली. या स्थानाच्या मान्गल्यामुळे या स्थानी सद्गुरु साईनाथ महाराज,
शेगावचे संत श्री गजानन महाराज, अक्कलकोट येथी स्वामी समर्थ या ठिकाणी
वास्तव्यास आले होते. त्यामुळे ह्या स्थानाचे पावित्र्य अधिकच वाढले आहे.
गंगास्थानातील हे गंगाजल मधुमेह व रक्तदाब या विकारांवर परिणामकारक असल्याचे मानण्यात आले. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. शहापूर पंचक्रोशीतील एक जेष्ठ तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी गंगापुजनाचा विधी येथे केला जातो. आसनगाव रेल्वे स्थानकापासून २ कि. मी., शहापूर गावापासून १ कि. मी. व मुंबई- नाशिक महामार्गापासून १/२ कि.मी. अंतरावर असलेले हे सुमारे ७०० वर्षापूर्वीचे ठिकाण तीर्थस्थान म्हणून जेष्ठ व पवित्र आहे.
गंगास्थानातील हे गंगाजल मधुमेह व रक्तदाब या विकारांवर परिणामकारक असल्याचे मानण्यात आले. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. शहापूर पंचक्रोशीतील एक जेष्ठ तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी गंगापुजनाचा विधी येथे केला जातो. आसनगाव रेल्वे स्थानकापासून २ कि. मी., शहापूर गावापासून १ कि. मी. व मुंबई- नाशिक महामार्गापासून १/२ कि.मी. अंतरावर असलेले हे सुमारे ७०० वर्षापूर्वीचे ठिकाण तीर्थस्थान म्हणून जेष्ठ व पवित्र आहे.