Modak Sagar Dam Vaitarna, Modak Sagar Dam News, Modak Sagar Dam Information in Marathi, Modak Sagar Lake, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.
शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी वैतरणा हे एक महत्त्वाचे धरण आहे. मुंबई - कसारा रेल्वे मार्गावरील खर्डी या कसारा आधीच्या रेल्वे स्टेशनपासून वैतरणा हे गाव व धरण १६ किमी अंतरावर वसलेले आहे. खर्डी स्टेशनवरुन कसारा लोकलला कनेटेक्ड राज्य परिवहन मंडळाची बससेवा असून खाजगी जीप सुद्धा येथे जातात. खर्डी स्टेशनवर उतरुन पश्चिम खडी गावातून वैतरणा धरणाकडे जाणाऱ्या जीप उपलब्ध होतात. तसेच खर्डी स्टेशनवरुन बसेस आहेत. खर्डी गावातच ३०० वर्षांची परंपरा असलेले सोनाई मातेचे मंदिर आहे. वैतरणा धरण समुद्रसपाटीपासून ५३५ मीटर उंचीवर आहे. या
नैसर्गिक उंचीमुळे उताराचा फायदा मिळून पाणी पंपशिवाय जाते. एप्रिल १९४९ मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाले व पुढील ६ वर्षांत नोव्हेंबर १९५१ रोजी काम पूर्ण झाले आणि ६ ऑक्टोबर १९५५ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन झाले. संपूर्ण भारताचा पसारा ३२ कि.मी. असून खोली २७१ फूट आहे. बांधकामाला १७.१६ करोड रुपये खर्च आला. या धरणाला जागतिक कीर्तीचे वास्तुशास्त्रज्ञ आणि नगररचना तज्ज्ञ कै. नारायण विनायक तथा नानासाहेब मोडक यांच्या स्मरणार्थ मोडकसागर असे सुद्धा संबोधले जाते.
संपूर्ण धरणात एकूण आठ गेट आहेत. त्यापैकी चार गेट्स ॲटोमॅटिक आणि चार इलेक्ट्रीक आहेत. ॲटोमॅटिक गेट्स २६ ४० तर इलेक्ट्रीक गेट्स २४४० आहेत. धरणाला दोन मल्टीगेट असून त्याची साईज १७२१ फूट आहे. पाण्याचा गाळ बाहेर निघावा म्हणून मल्टी गेट्स उघडली जातात. साधारणपणे ५३५ फूट नंतर पाणी ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहू लागते. धरणाचे एकूण तीन भाग आहेत. त्यांना गॅलरी असे म्हणतात. सर्वांत मागील वरचा भाग (Upper) त्यानंतर मधला भाग आणि सर्वांत खालचा म्हणजे तळभागाला (Lower) असे म्हणतात. मुंबईला पाणीपुरवठा करणारी इंटेक गेटस आहे ते चार प्रकारचे आहे. पाण्याची पातळी ४६०, ४८०, ५१०, ५२० अशी आहे. संपूर्ण धरण ३६ सांध्यांपासून बनलेले आहेत.
धरणाचे पाणी मुंबईला जाण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण केल जाते. या फिल्टरप्लॅन्टमध्ये वाळू रेतीचा वापर केलेला आहे. क्लोरीनचा वापर केला जातो. पाणी निर्जंतूक केले जाते आणि नंतर त्याचा मुंबईला पुरवठा केला जातो.
इतर तीन धरणांप्रमाणे वैतरणा धरणही पावसाळ्यातील एक दिवसीय सहलीचे एक चांगले ठिकाण आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रेस्ट हाऊसमध्ये Advance बुकिंग करुन राहण्याची सोय होते. भरुन वाहणारे धरण, अजूनही चांगल्या प्रकारे अस्तित्वात असलेले वन, हिरवीगार वनश्री, भरपूर पाऊस, रहाण्याची उत्तम सोय यामुळे वैतरणा धरण हे सहलीचे उत्तम ठिकाण आहे.