शहापूर मधील कासारआळीत असलेले श्री विठ्ठल मंदिर एका शतकापुर्वीच आहे. ई स.
१८९० चा सुमारास मंदिर उभारण्यात आले नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याचे
तत्कालीन मामलेदार कै. देव यांच्या प्रेरणेने मंदिराची स्थापना झाली. देव
यांचे शिष्य कै. शंकर अमृत महाजन (कवाड भिवंडी) यांनी विठ्ठल रखुमाई
मूर्तीची स्थापना केली. मंदिरासाठी जागा कै. विठ्ठल हजारे यांनी दिली तर
शंकर केशव गोडबोले यांनी पुढे मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर बांधून
पूर्ण झाल्यानंतर व इमारत अस्तित्वात आल्यानंतर कै. शंकर महाजन यांच्या
प्रयत्नाने मंदिरात उत्सव सुरु करण्यात आला.
श्रावण शुद्धपौर्णिमा (
नारळी पौर्णिमा) ते वद्य अष्टमी हा उत्सवाचा कालावधी असतो. देवाच्या
नावाने गावात भिक्षा मागून मंदिराचा सर्व खर्च भागवण्याची पद्धत
स्थापनेपासून अस्तित्वात आली. मंदिराची रचना इतर नेहमीच्या मंदिरांप्रमाणे
आहे. सौंदर्यापेक्षा उपयुक्ततेला महत्व देण्यात आले आहे. सभामंडप, गाभारा,
माडी, लाकडी खांब अशी साधारणपणे रचना आहे.