Bhatsa Dam Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra

Bhatsa Dam, Bhatsa Lake and Dam, Bhatsa Dam Information, Where is Bhatsa Dam, Bhatsa Dam Distance, Bhatsa Dam Picnic Spot, Bhatsa Dam Capacity, Bhatsa Dam History, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.

Bhatsa Dam, Bhatsa Lake and Dam, Bhatsa Dam Information, Where is Bhatsa Dam, Bhatsa Dam Distance, Bhatsa Dam Picnic Spot, Bhatsa Dam Capacity, Bhatsa Dam History, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.

 शहापूर तालुक्यातील मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठा नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच दगडी धरण हे त्याचे वैशिष्ट्य आहे. उल्हास नदीची भातसा ही उपनदी असून या नदीवर हे धरण बांधले असल्याने त्याला भातसा प्रकल्प हे नाव प्राप्त झाले आहे. पण प्रत्यक्षात हे धरण भातसा नदी व चोरणानदीच्या संगमावर बांधले आहे. मुख्य नदी भातसा नदी असल्याने त्याला भातसा प्रकल्प म्हणतात. या नदीला भातसई असेही संबोधले जाते. शहापूर तालुक्यातील साजिवली गावाच्या ठिकाणी हे धरण बांधलेले आहे. भातसानदी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडे जाताना कसारा घाट ओलांडल्यावर ठाणे जिल्हा हद्द व नाशिक जिल्हा हद्द यांच्या सरहद्दीवर उगम पावते आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ती येतांना तिला चोरणा, भारंगी यासारख्या नद्या येऊन मिळतात. भातसा धरण शहापूरपासून २० कि.मी. अंतरावर आहे. शहापूरपासून नाशिककडे जाताना सुमारे १२ कि.मी. अंतरानंतर उजव्या हाताला जाणारा रस्ता असून तेथून सुमारे ८ कि.मी. भातसा प्रकल्प लागतो. प्रकल्प असल्याने सर्व श्रेणीच्या लोकांची निवासस्थाने, बाजार कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सोय, उत्तमप्रतीचे शासकीय विश्रामगृह, भूकंपाचे मोजमाप करणारी यंत्रणा अशा सोयी या ठिकाणी आहेत.


या धरणाचे कामकाज १९६९ मध्ये सुरु करण्यात आले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरु झाले त्यावेळी १३६८ रुपये इतका खर्च हेता. १९७३ पर्यंत कामाची निर्धारीत गती कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर १९८३ पर्यंत ह्या प्रकल्पाचा  खर्च ७९६६ लक्ष रुपयांवर तर १९९४-९५ पर्यंत हा खर्च ३५८२४ लक्ष इतका पोहचला. २००० पर्यंत हे काम जवळजवळ पूर्णावस्थेला आलेले आहे. मुंबईला तानसा, वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार अशी पाच धरणे पाणीपुरवठा करतात. तो २८७७ दशलक्ष लिटर्स इतका आहे. भातसा प्रकल्पातून सुमारे ५० टक्के म्हणजे १३५० दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा केवळ या प्रकल्पातून होतो हे या प्रकल्पाचे दुसरे वैशिष्ट्य.

धरणाची कमाल उंची ८९ मीटर (सुमारे २७० फूट) असून धरणाची एकूण बांधकाम ५१८००० घनमीटर क्षेत्रात झाले असून त्यासाठी खोदकाम ७०५३० घनमीटर करण्यात आले. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौ. कि. मी. असून त्यात ९७६.१० दशलक्ष घन मीटर इतका जलसंचय केला जातो. पूर्ण संचय पातळी १४५०५ मीटर आहे.

या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडण्यात येणारे पाणी याच नदीवर पिसे येथे बंधारा बांधून त्यातील पाणी उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. उदंचन पद्धत ही या धरणाचे तिसरे वैशिष्ट्य तर विद्युतनिर्मिती करून वापरलेले पाणी बोगद्याद्वारे पुन्हा नदीत सोडले जाते. हे सुद्धा या धरणाचे वैशिष्ट्य आहे. या धरणाच्या पायथ्याशी एक विद्युत गृह बांधले असून एका व्हर्टिकल जनरेटरच्या मदतीने ३६.३० घनमीटर प्रती सेकंद इतके पाणी वापरुन त्यापासून १५ मेगॉवॉट इतकी विद्युत निर्मिती केली जाते.

या धरणाचा उजवा कालवा ६७ किलोमीटर लांबीचा तर डावा कालवा ५४ किमी लांबीचा आहे. या कालव्याच्या वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, उल्हास, कुंभारी अशा वेगवेगळ्या शाखा असून ९१ किमी. लांबीच्या शाखा कालव्याद्वारे सिंचन होणार असून उजव्या कालव्याने १६६६८० हेक्टर तर डाव्या कालव्याने ६३२० हेक्टर क्षेत्र ओलीस येणार आहे. या धरणामुळे एकूण २३००० हेक्टर इतके सिंचन क्षेत्र आहे. भातसा नदीच्या भुमरी या उपनदीवर सारंगपुरी या गावाजवळ ७२.४० दशलक्ष घन मीटर क्षमतेचे धरण बांधले जाणार असून त्यासाठी ५०५१ लक्ष खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने भातसा धरणामुळे मुंबईला पाणीपुरवठा अधिक जमीन

सिंचनाद्वारे ओलीताखाली आणणे आणि विद्युतनिर्मिती अशी तीनही उद्दिष्टे साध्य होणार असल्याने याला बहुउद्देशीय प्रकल्प म्हणणेच योग्य ठरेल. जुलै महिन्यानंतर धरण ओसंडून वाहू लागते त्यावेळी पावसाळ्यात येथील सौंदर्य अवर्णनीय असते. येथे विश्रामगृहाची सोय आहे, परंतु पूर्वसूचना देऊन ते आरक्षित करावे लागते. विश्रामगृहातून दिसणारे संपूर्ण धरण, कालव्यातून व धरणांतून पाणी बाहेर पडण्याचा आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, पक्ष्यांचे कुंजन, विश्रामगृहातून दिसणारा सूर्योदय, आजूबाजूस असणारी फिरण्याची ठिकाणे या सर्वांमुळे हे ठिकाण पावसाळ्यातील एक दिवसाचे सहलीचे उत्तम ठिकाण आहे. मात्र हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने रीतसर पूर्व परवानगी घेऊन येणे आणि किमान सुरक्षिततेते नियम पाळणे केव्हाही महत्त्वाचे.