Jambhe Dam Shahapur Thane



Jambhe Dam Shahapur, Jambha Dam, Jambhe Dam Overflow Shahapur, Dam Near Shahapur Thane, Maharashtra


पावसाळा सुरू झाला की मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कलयाण येथील पर्यटकांचे पाय वळतात ते शहापूरकडे. निसर्गसौंदर्य लाभलेला हा तालुका म्हणजे पर्यटकांसाठी मेजवानीच म्हणावा लागेल.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, तानसा, मोडकसागर ही जलाशये, तर ट्रॅकरसाठी माहुली किल्ला, बळवंतगड, आजा पर्वत, तर स्वछंद भिजण्यासाठी नरपंडी, अशोका, टँगो, माहुली हे प्रमुख धबधबे, तसेच वनविभागाचे वाफे येथील निसर्ग पर्यटन केंद्र व नुकतेच साकारणारे नक्षत्रवन, चोंढे, घाटघर प्रकल्प, मानस मंदिर, गंगा देवस्थान, अशी अनेक पर्यटन स्थळे तालुक्यामध्ये असून शनिवार व रविवारी शेकडो पर्यटक शहापुरात दाखल होत असतात.

 
लोणावळा येथील भुशी डॅम येथे होणार्‍या पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचा अनुभव शहापूर तालुक्यातील भुशी डॅम म्हणजेच जांभे धरणावर येतो. हे धरण जलसंपदा विभागाच्या मालकीचे असून वर्षाकाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. यामध्ये पावसाळी येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहापूरपासून जवळच असलेल्या या जांभे धरणावर यथेच्छ पांढर्‍या शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात. विशेष म्हणजे लहान मुलांसाठीही इथे भिजताना कोणतीही भीती नसल्यामुळे लहान मुलेदेखील भिजण्याचा आनंद घेतात. एकंदरीत कुटुंबासोबत जाण्यासाठी हे जांभे धरण एक छान पर्याय आहे. हे धरण भरलयापासून हजारो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. या धरणासमोरच स्वयंभू शिवमंदिरदेखील आहे. या ठिकाणी जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे जेवण सोबतच घेऊन जावे लागते.



कसे पोहचावे ?

मुंबईहून रेल्वेने येत असाल तर आसनगाव स्टेशनला उतरून शहापूरच्या बस स्थानकाजवळ जांभे गावात जाणार्‍या प्रवासी गाड्या उभ्या असतात. तसेच शहापूर बस स्थानकातूनही एसटी बस असतात अन्यथा मुंबई-नाशिक महामार्गावरून शहापूर येथे यावे व येथून १५ किमी अंतरावर शहापूर-मुरबाड रोडवर १० किमी गेलयावर शेंद्रूण येथे यावे व येथून जांभे गावाकडे जाणारा रस्ता आहे. तसेच कल्याण-नगरमार्गे मुरबाडवरूनदेखील या ठिकाणी येता येते. एकंदरीत आठवड्याच्या शेवटचे शनिवार व रविवार कुटुंबासोबत पांढर्‍या शुभ्र पाण्याचे शहारे अनुभवायचे असतील तर जांभे धरणाला नक्की भेट द्या.

 
Jambhe Dam Shahapur, Jambha Dam, Jambhe Dam Overflow Shahapur, Dam Near Shahapur Thane, Maharashtra