शहापुरातील श्री लक्ष्मी-नारायण मंदिर हे जुने मंदिर आहे. वैश्य समाजाची वस्ती स्थिरावल्यानंतर वैश्य समाजाने मंदिर उभारण्याचे ठरवले. सुरुवातीला लक्ष्मी-नारायणाऐवजी विठ्ठल-रखुमाईची स्थापना करण्याचे ठरवले होते, परंतु मुर्तीकाराकडे लक्ष्मी-नारायणाची मूर्ती उपलब्ध असल्याने त्यांची प्रतिस्थापना करण्यात आली. हे मंदिरही इतर मंदिराप्रमाणेच आहे. गाभाऱ्यात
एका चौथऱ्यावर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती असून सभा मंडपात डाव्या हाताला चौथारयावरील चौकटीत विष्णूचे वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गरुडाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे.
लक्ष्मी-नारायणाच्या ह्या मूर्ती मुंबईतील ठाकुरद्वार येथी झावबा मंदिरात होत्या, त्या लहान असल्याने तेथे त्यांची प्रतिस्थापना केली नव्हती. या मूर्ती १९२५ च्या सुमारास शहापूरमध्ये आणण्यात आल्या. सुरुवातीला मंदिर वगेरे न बांधता केवळ मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.

मंदिरातर्फे कीर्तन, भजन, हनुमान जयंती, श्रीकृष्ण जयंती ई. धार्मिक उपक्रम राबवले जातात. ह्या व्यतिरिक्त शहापुरात संतोषी माता, अंबिका माता, शीतला माता, ताडोबा मंदिर, शिव मंदिर, साईबाबा मंदिर अशी अन्य देवदेवतांची मंदिरे आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यातही विविध देवदेवतांची मंदिरे गावोगावी आहेत.