ह्या संकेतस्थळावर प्रकाशित केली माहिती हि डॉ. विजय कुलकर्णी यांच्या "शहापूर दर्शन" ह्या पुस्तकातील आहे. डॉ.
विजय कुलकर्णी हे शहापूरच्या सोनुभाऊ बसवंत महाविद्यालात इतिहासाचे
प्राध्यापक आहेत. त्यांनी केलेला शहापूरचा इतिहासाचा अभ्यास हा खरच कौतूकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांना अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असाच एक प्रयत्न आम्ही ह्या संकेतस्थळाद्वारे करत आहोत. त्यांनी प्रकाशित केल्या "शहापूर दर्शन" ह्या पुस्तकाबद्दल त्यांचे मनपुर्वक अभिनंदन.
माहुलीसारख्या एका ऐतिहासिक स्थळाच्या सावलीत वसलेले शहापूर, साहजिकच इतिहासाशी नात असणार. व्यक्ती, समाज आणि त्यांच्या सभोतालचा परिसर यांचे एक अतूट नाते असते. ते दृढ व्हायला परिसराची ओळख असायला लागते. शहापूरच्या आसपास असलेले देवळांचे भग्नावशेष, गडकिल्ले आणि आता धरणे शहापूरची ओळख बनले आहेत. तालुक्याची ओळख आजसुद्धा आदिवासी तालुका म्हणून केली जाते.१८८० मध्ये कोळवण तालुका शहापूर झाला. शहापूरच्या सभोवार असणाऱ्या डोंगरांवर दोन किल्ले इतिहासाशी निगडीत आहेत. तर तिसरा अजापर्वत व त्यावरील वाल्मिकी आश्रम शहापूरला थेट रामायणापर्यंत घेवून जातो.
शहापूरच्या परीसरातल्या वीसेक देवळापैकी जास्त देवळ शिव/शाक्त पंथी आहेत. दुसरे ऐतिहासिक कारण म्हणजे हा प्रदेश शैवभक्त असलेल्या शिलाहारांच्या राज्यात मोडत होता. जवळजवळ ८५ वर्षापूर्वी इथे पहिल्यांदा जैन मंदिराची स्थापना झाली. सन १८५५ मध्ये वासिंद म्हणजेच शहापूर तालुक्यात रेल्वे आली. वासिंदच्या आसपासच जंगल हे शिकाऱ्यांच खास मैदान. आता ते जंगल फक्त आठवणीत राहील आहे.